ताज्या बातम्या

शिक्षक भारती संघटनेचा पाठपुरावा यशस्वी!वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र 17 मार्च रोजी मिळणार!

प्रतिनिधी : वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण टप्पा 2 दिनांक 25 10 2025 ते 3 11 2025 या कालावधीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या सूचनेनुसार प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई मार्फत आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र देण्याबाबतची मागणी शिक्षक भारती संघटनेने संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडे केली होती. सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी दिली.

त्यानुसार पात्र प्रशिक्षणार्थी शिक्षक व तज्ञ सुलभक यांना 17 मार्च रोजी प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई या कार्यालयातून वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण टप्पा 2 यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र दिले
जाणार आहे. प्रमाणपत्र वाटपाचे वेळापत्रक जाहीर केले असून वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणार्थी व सुलभक यांना सकाळी 9 ते 1 आणि निवड श्रेणी प्रशिक्षणार्थी व सुलभक यांना दुपारी 2 ते 5 या वेळात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आपले शालेय कामकाज सांभाळून प्रमाणपत्र घेण्यासाठी प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी यावे. तर सर्व सुलभक यांनी मात्र दिलेल्या वेळेत पूर्ण वेळ येऊन प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्र वितरित करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top