ताज्या बातम्या

आनंदाच्या रंगाने आनंदवन गृहनिर्माण सोसायटीत रंगली होळी; उत्साहात साजरा रंगोत्सव

पनवेल (अमोल पाटील) : फाल्गुन पौर्णिमेनिमित्त आनंदवन गृहनिर्माण सोसायटीत होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व रहिवाशांनी एकत्र येत रंगोत्सवाचा आनंद लुटला. संपूर्ण सोसायटी परिसर रंगीबेरंगी गुलालाने न्हाऊन निघाला होता.
सकाळपासूनच “होळी है!”च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. रहिवाशांनी एकमेकांना नैसर्गिक रंग लावत सणाच्या शुभेच्छा दिल्या. यंदा पाण्याची बचत आणि पर्यावरणपूरक सण साजरा करण्यावर विशेष भर देण्यात आला. त्यामुळे कोरडी होळी खेळत सामाजिक जबाबदारी जपली गेली.
महिलांनी पारंपरिक वेशभूषेत फुगड्या खेळत होळीची गाणी सादर केली, तर युवकांनी डीजेच्या तालावर नृत्य करत जल्लोष केला. लहान मुलांसाठी विविध खेळ आणि रंगोत्सव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.

आनंदवन गृहनिर्माण सोसायटीतील होळी उत्सवाने आनंद, बंधुभाव आणि एकात्मतेचे सुंदर चित्र उभे केले. रहिवाशांच्या सहभागामुळे हा रंगोत्सव अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमात पुरुष, महिला ,लहान मुले यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रंगांचा आनंद लुटला.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top