तळमावले/वार्ताहर : शासनाच्या निर्णयानुसार मार्च ते मे 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व सामाधान शिबीर अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरवात होत असून हे अभियान शनिवार दि.7 मार्च, 2026 रोजी ढेबेवाडी, कुठरे, तळमावले या ठिकाणी होत आहे. हे अभियान पोहोचवण्यासाठी व त्याचा लाभ घेण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाटणचे तहसिलदार अनंत गुरव यांचे मार्गदर्शन आणि संकल्पनेनुसार तालुक्यातील अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांच्याकडून पोस्टर रेखाटून घेतले आहे. या पोस्टरमधील अक्षरे आणि छोटे लोगो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या चित्राचे तहसिलदार अनंत गुरव यांनी कौतुक केले आहे.
या समाधान शिबीरात प्रलंबित फेरफार काढणे, अभिलेख दुरुस्ती हेल्पडेस्क, लोकसेवा कायद्यानुसार सेवा, महसुल सुधारणाबाबत मार्गदर्शन, डिजिटल 7/12 जनजागृती, म.ज.न.संहिता 1966 मधील बदल इ.सेवा देण्यात येणार आहेत. यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय पाटण, मंडळ अधिकारी, ग्राम महसुल अधिकरी व इतर सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून प्रसिध्द असलेले अक्षरगणेशाकार संदीप डाकवे हे चांगले लिखाण ही करतात. त्यांनी शासनाच्या विविध योजनांवर विपुल लेखन केले आहे. यामध्ये महात्मा गांधी तंटाममुक्ती अभियान, बचत गट, जलयुक्त शिवार अभियान, लेक वाचवा, कृषी योजना, व्यसनमुक्ती इ.विविध अभियानावर लेखन केले आहे.
केवळ लेखन न करता त्याला आपल्या कलात्मक संकल्पनेतून चांगली प्रसिध्दीही दिली आहे. यासाठी त्यांनी पोस्टर प्रकाशन, प्रसिध्द बातम्यांच्या कात्रणांचे प्रदर्शन, हस्तलिखित, व्यंगचित्रे इ.गोष्टींचा खुबीने वापर केला आहे.
संदीप डाकवे यांनी जलयुक्त शिवार अभियानावर लिहलेल्या लेखांचे पुस्तक तत्कालिन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, आ.शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व अन्य मान्यवर यांनी केले आहे.
शासनाच्या विविध योजना सातत्याने लोकापंर्यंत प्रभावीपणे पोहवण्याचे काम करत असलेल्या अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांच्या या अभिनव पोस्टरचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, तालुक्यातील नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी होवून या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी सोपान टोपे व तहसीलदार अनंत गुरव यानी केले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानावर लिखाण
स्वच्छ सर्वेक्षण लीग 2026 या विषयावर पत्रकार संदीप डाकवे सध्या लेखन करीत आहेत. यंदा या अभियानाला व्यापक प्रसिध्दी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्या लेखमालेचे आतापर्यंत 30 भाग प्रसिध्द झाले असून या लेखमालेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.




