नवी मुंबई : परिसरातील नागरिकांना सुलभ व परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध व्हावीत या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या महादेव मेडिकलचे उद्घाटन माजी खासदार डॉ. संजीवजी नाईक यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. हे मेडिकल रोहित मसाला शेजारी, गुलाब सन्स समोरील गल्ली, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे सुरू करण्यात आले आहे.
यावेळी नगरसेवक संदीप म्हात्रे, रॉबिन मढवी, रामचंद्र शेठ घरत तसेच नगरसेविका सौ. शुभांगीताई पाटील व सायलीताई शिंदे यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला. कार्यक्रमास ह.भ.प. आनंद महाराज कोंढाळकर, रमेश सकपाळ सर, बजरंग दादा मोरे, पत्रकार भीमराव धुळप, चंद्रकांत संकपाळ, प्रो. प्रा. बाळासाहेब शिंदे, सौ. सीमा तुषार शिंदे यांसह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. संजीवजी नाईक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आरोग्य सेवेचे महत्त्व कोरोनाकाळात प्रकर्षाने जाणवले. वेळेवर उपचार व योग्य औषधे घेतल्यास रुग्ण लवकर बरा होतो. त्यामुळे वाजवी दरात दर्जेदार औषधे उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानली जाते; जसे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे, तसेच आरोग्य सेवा ही समाजासाठी मोठी संपत्ती आहे. महादेव मेडिकलने या तत्त्वांचे पालन करून नागरिकांची विश्वासार्ह सेवा करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
होलिका देवी उत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत त्यांनी महादेव मेडिकल जनतेच्या सेवेसाठी लोकार्पित झाल्याची घोषणा केली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.




