ताज्या बातम्या

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.),आर. सी. एफ तर्फे ओम साई मित्र मंडळ,साईधाम शिवाजीनगर शिवदर्शन गृ.स.सं. मर्या.)वाशी नाका चेंबूर येथे आरोग्य शिबीर संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर ) :ओम साई मित्र मंडळ, साईधाम शिवाजीनगर शिवदर्शन गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित वाशी नाका चेंबूर मुंबई-४०० ०७४ येथे श्री साईनाथ मंदिर २४ वा वर्धापन वर्धापन दिनानिमित्तविविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यानिमित्ताने विभागातील नागरिकांसाठी पंचरत्न मित्र मंडळ (रजि.),आर.सी. एफ तर्फे आरोग्य शिबीरही घेण्यात आले.साईनाथ मंदिर २४ वा वर्धापन वर्धापन दिनानिमित्त आयोजित आरोग्य शिबीरमध्ये अनेक नागरिकांनी लाभ घेतला.वैद्यकीय शिबिरमध्ये रक्तदाब तपासणी, शुगर तपासणी, बोन डेन्सिटी, पी. एफ. टी. टेस्ट, बी. एम. डी. टेस्ट, नेत्रचिकित्सा, मोफत औषधे आणि आवश्यकता असेल त्यांना चष्मा वाटप याचा समावेश होता.२२५ लोकांचे आरोग्य तपासणी करून मोफत औषधे तसेच १७५ लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.निरंजन सोनक साहेब संचालक (विपणन), आर.सी.एफ.लि. चेंबूर, मुंबई,मा.श्री.शशिकांत हेडाऊ साहेब महाव्यवस्थापक, आय पी डी आर.सी.एफ.लि., तर विशेष पाहुणे म्हणून मा.श्री. संतोष शिकतोडे साहेब उप अभियंता, नवी मुंबई महानगरपालिका,डॉ.विनित गायकवाड डॉ. श्रुतिका कांबळे उपस्थित होते. तर विशेष सहकार्य – ओम साई मित्र मंडळ यांचे लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील मिस्त्री यांनी केले.या कार्यक्रमासाठी श्री. वैभव घरत, श्रीमती नीलम गावंड,राम पाटील,किशोर आंग्रे,सचिन डेरे, सचिन राखाडे, मॅथ्यू डिसूजा, उपाध्यक्ष रमेश पाटील,संदीप पाटील,स्वाती पाटील,अंजली मोया आदि पदाधिकारी,सदस्य आणि सभासद यांचे विशेष सहकार्य लाभले.ओम साई मित्र मंडळ अध्यक्ष किशोर महादेव आंग्रे,उपाध्यक्ष हनुमंता हुलप्पा पुजारी, सचिव राम ज्ञानू पाटील,सचिव बबन तुकाराम फागे , खजिनदार मनोहर गणपत साटम व सर्व मंडळाचे सभासद आणि रहिवाशी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
समाजात विविध क्षेत्रांत लोक कल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था आहेत.या संघटना एका विशिष्ट हेतूने काम करते यातील स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात.या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांना अनेक प्रकारे साहाय्य करतात. अन्नधान्य , कपडे , गृहोपयोगी वस्तू , औषधे , वह्या पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणेतसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळ गेली अनेक वर्षे निस्वार्थी पणे करीत आहे.समाजाचे ऋण फेडण्यासाठी सतत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड खजिनदार सचिन साळूंखे , उपाध्यक्ष रमेश पाटील , सहसचिव वैभव घरत , सल्लागार हनुमंता चव्हाण, सर्व महिला -पुरुष कार्यकर्ते यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top