ताज्या बातम्या

मौजे घोगाव येथे सात ठिकाणी रबरी स्पीडब्रेकर बसविण्याचा निर्णय

कराड(प्रताप भणगे) : मौजे घोगाव (ता. कराड, जि. सातारा) येथील कराड–चांदोली राज्य मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्याने अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. श्री संतकृपा मंदिर, संतकृपा कॉलेज तसेच घोगाव गावाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते. श्री बाळसिद्ध मंदिरात येणारे भाविक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ग्रामस्थ रस्ता ओलांडताना वारंवार अपघात घडत असल्याने स्पीडब्रेकरची मागणी सातत्याने होत होती.
या पार्श्वभूमीवर धगधगती मुंबईचे संपादक व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पत्रकार भीमराव धुळप यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे निवेदन सादर केले होते. या निवेदनाची तात्काळ दखल घेत मंत्री महोदयांनी संबंधित विभागाला त्वरित व उचित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार कराड–चांदोली मार्गावरील घोगाव परिसरात एकूण सात ठिकाणी रबरी स्पीडब्रेकर बसविण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार भीमराव धुळप यांनी दिली. मंत्री महोदयांनी अर्जाचा त्वरित विचार केल्याबद्दल समस्त घोगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे अपघातांवर नियंत्रण येऊन नागरिकांच्या सुरक्षिततेला मोठा दिलासा मिळणार आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top