कराड(प्रताप भणगे) :

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचा भव्य शुभारंभ नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. शेतकरी, उद्योजक आणि पशुपालकांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या या प्रदर्शनाने परिसरात विकासाभिमुख वातावरण निर्माण केले.
या शुभारंभ सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी भूषविले. प्रमुख उपस्थितीत नितीनकाका पाटील (खासदार, राज्यसभा सदस्य), मनोजदादा घोरपडे (आमदार), नरेंद्र पाटील (अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ), बाळासाहेब सोळसकर (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सातारा), उदयसिंह पाटील (उंडाळकर) (चेअरमन, रयत सहकारी साखर कारखाना लि., शेवाळेवाडी) यांची उपस्थिती होती.
यावेळी कराडचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह सातारा जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (सातारा), उपविभागीय पोलीस अधिकारी (कराड) तसेच विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रदर्शनाच्या माध्यमातून आधुनिक कृषी तंत्रज्ञान, औद्योगिक संधी आणि पशुपालन क्षेत्रातील नव्या संकल्पनांची माहिती शेतकरी व नागरिकांना मिळणार असून, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विकासदृष्टीला हे प्रदर्शन योग्य मानवंदना ठरत असल्याचे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.




