ताज्या बातम्या

दिवा शहरातील आगासन येथे उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा! १ मे रोजी होणार भूमिपूजन सोहळा पुतळा उभारणार; खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

दिघा : कल्याण लोकसभा मतदारसंघातील
विकासकामांना गती मिळत असून दिवा शहरातील आगासन रोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे.या कामासाठी राज्याच्या नगरविकास विभागाकडून एकूण ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्वपूर्ण निधी उपलब्ध झाला आहे.यासाठी माजी उपमहापौर तथा तत्कालीन नगरसेवक रमाकांत मढवी यांनी देखील पाठपुरावा केला होता.या सातत्यपूर्ण यश आले असून पुतळा उभारण्याच्या प्रत्यक्ष कामासाठी एकूण २ कोटी रुपयांची निविदा जाहीर झाली आहे. यामुळे येत्या १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आगासन येथे
या पुतळ्याच्या प्रत्यक्ष उभारणीचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून गेल्या काही वर्षांत रस्ते, पाणीपुरवठा,आरोग्य,शिक्षण,क्रीडा सुविधा,सांस्कृतिक वारसा संरक्षण अशा विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. दिवा शहरातील शिव प्रेमींसाठी ही खरोखरच आनंदाची आणि स्वाभिमानाची बातमी आहे.दिवा,कल्याण,डोंबिवली,अंबरनाथ या भागामध्ये पायाभूत सुविधा उभारणीपासून ते स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण करण्यापर्यंत अनेक प्रकल्प राबविण्यात आले आहेत.डोंबिवली आणि मानपाडा नंतर आता दिव्यातही महाराजांचे स्मारके उभे राहिल्यामुळे शहाराच्या सांस्कृतिक वैभवात अधिकच भर पडेल.याच पद्धतीने खासदार डॉ.शिंदे यांच्या पुढाकाराने डोंबिवली येथील घारडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. मानपाडा येथे मेघडंबरीत विराजमान असलेल्या महाराजांचा पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.पायाभूत सुविधासोबतच अस्मितेच्या चिन्हांनाही महत्व दिले जाते असल्याचे यातून दिसून येते.छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अश्वारूढ पुतळा असावा अशी येथील स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमींची ही जुनी मागणी होती,आता पूर्णत्वास जात आहे.तर यासाठी माजी उपमहापौर तथा तत्कालीन नगरसेवक रमाकांत मढवी यांनी ही खासदार डॉ.शिंदे यांच्याकडे याबाबत मागणी केली होती.राज्याच्या नगरविकास विभागाकडून एकूण ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यातील २ कोटी रुपयांच्या कामांची निविदा आता जाहीर झाली आहे.खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि माजी उपमहापौर तथा तत्कालीन नगरसेवक रमाकांत मढवी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रकल्प मार्गी लागला आहे.येत्या १ मे रोजी आगासन येथे या पुतळ्याच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरू होणार असल्याची माहिती माजी उपमहापौर तथा तत्कालीन नगरसेवक रमाकांत मढवी यांनी दिली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा केवळ एक स्मारक नसून स्थानिकांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी तो एक प्रेरणादायी ठरेल. दिवा शहराच्या विकासासोबतच सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचे काम या प्रकल्पामुळे यशस्वीरित्या पूर्ण होत आहे,असे विश्वास व्यक्त होत आहे.खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी यापूर्वी मतदारसंघातील अनेक विकास प्रकल्पासाठी निधी मिळवून दिला असून,नागरिकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न सुरू आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top