ताज्या बातम्या

साताऱ्यात टी. व्ही. त दिसले… पण ,चांगली लढत देऊन हरले बिचुकले…

सातारा(अजित जगताप) : छत्रपतींची राजधानी आणि घटनाकार डॉक्टर आंबेडकर यांचे शाळा प्रवेश भूमी असलेल्या सातारा नगरीच्या नगरपालिका निवडणूक पार पडली. यामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाजपचे श्री अमोल मोहिते विक्रमी मताने निवडून आले. तर दुसऱ्या बाजूला टी.व्ही. त दिसले पण सेलिब्रिटी असलेली अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले चांगली लढत देऊन हरले. याची आता महाराष्ट्रात चर्चा रंगू लागलेली आहे.
भारत देशातील लोकशाहीमध्ये निवडणूक म्हटले की लोकशाहीचा उत्सव असतो. यामध्ये सहभागी होऊन निवडणुकीत आपला अर्ज कायम ठेवणारे नेहमीच चर्चेत राहतात. अशा पद्धतीने उत्तर भारतामध्ये धरती पकड हे नावाजलेले उमेदवार होते. त्यांनी सर्व प्रकारच्या निवडणुका लढवून एक विक्रम केला होता. सातारचे सुपुत्र व स्वतःला छत्रपती शिवराय व घटनाकार डॉक्टर आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा समजणारे सेलिब्रिटी
अभिजीतच बिचुकले हे नेहमीच चर्चेत असतात.

एकेकाळी सातारा नगरपालिका मध्ये कर्मचारी म्हणून काम करणारे सध्याचे लाडके सेलिब्रिटी अभिजीत बिचुकले हे स्वभावाने हटके असल्यामुळे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार…. स्वयंप्रकाशित व्हा… हे त्यांचे ब्रीद वाक्य आहे. त्यांनी स्वतःच्या कर्तबदारीवर आपले नाव सिने सृष्टी सोबतच सात समुद्रापलीकडे पोहोचवले आहे. सातारा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते अपक्ष म्हणून मैदानात उतरले त्यांनी चौथ्या क्रमांकाची मते मिळवून आपला करिष्मा दाखवून दिला आहे. आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांची जोरदार तयारी सुरू केली आहे. तू ना कभी रुकेगा.. तुना कभी थकेंगा ..अग्निपथ.. अग्निपथ.. अशीच त्यांची वाटचाल सुरू असते.

सातारा नगराध्यक्षपदासाठी राजकीय पक्षासोबत अपक्ष असे नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. भाजपचे अमोल मोहिते यांना ५७ हजार ५८७ दुसऱ्या क्रमांकावर पूर्वी भाजप प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या व आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी उमेदवार सौ सुवर्णादेवी पाटील यांना १५ हजार ५५५ आणि तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर यांना ३ हजार ९०० तर चौथ्या क्रमांकावर अभिजित बिचुकले यांना २ हजार ७७३ मतं मिळाली. एकूण सहा अपक्ष उमेदवार हे मैदानात होते.

प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीत अभिजीत बिचुकले यांना किती मतं मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याआधी बारामती मतदारसंघात ६८ सातारा-जावळी मतदारसंघात ५२९ तसेच वरळी विधानसभा मतदार संघातही त्यांना मते मिळाली होती. त्यांच्यासोबत हजारोच्य संख्येने सेल्फी काढण्यात येते. हा त्यांचा व्यक्तिगत करिष्मा आहे. परंतु, निवडणुकीच्या राजकारणातील रसद पोहचवणे. त्यांना शक्य नसल्यानेच ते पराभूत होत असतात. असे त्यांचे समर्थक सांगत आहेत.
निवडणुकीत सक्रिय सहभाग होऊन उमेदवारी टिकवणे. हे फार महत्त्वाचे आहे. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढून लोकशाही मानणाऱ्या सेलिब्रिटी अभिजीत बिचुकले यांच्यासारख्या सर्वच उमेदवारांचे कौतुक केले पाहिजे. दरम्यान ,साताऱ्यात वास्तविक पाहता सत्ताधारी व विरोधी राजकीय पक्षापेक्षाही रक्षक प्रतिष्ठानचे युवा नेते सुशील मोझर यांच्या मार्गदर्शनाखाली मयूर कांबळे व जयश्री जाधव यांच्यासोबतच अपक्षांनी मारलेली बाजी आणि शंकर किर्दत यांचा तीन मताने विजय तसेच नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या प्रभागातील भाजपचा पराभव अपक्ष म्हणून निवडून आलेले युवा नेते प्रशांत आहेरराव तसेच सर्वसाधारण गटातून बिनविरोध निवडून आलेले डॅशिंग कार्यकर्ते बाळासाहेब खंदारे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. याचीही चर्चा आता रंगू लागलेली आहे.

_______________________&&&&_________

फोटो______ सेलिब्रिटी अभिजीत बिचुकले यांच्या समवेत ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप (छाया, निनाद जगताप)

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top