मुंबई – चेंबूरच्या वाशी नाका येथे जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे उद्या बुधवार २९ मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून गुरुवार ३० मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत गोवंडी,चेंबूर व माहुलच्या काही भागात पाणीपुरवठा राहणार बंद राहणार आहे,
असे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले.बी.डी. पाटील मार्ग वाशी नाका येथे ४५० मिलीमीटर व ७५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
या जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे चेंबूरच्या एम पूर्व विभागातील गोवंडीच्या लक्ष्मी वसाहत,राणे चाळ, नित्यानंद बाग,तोलाराम वसाहत,श्रीराम नगर, जे.जे.वाडी,शेठ हाइट्स, डोंगरे पार्क,टाटा वसाहत,
बीपीसीएल वसाहत, एचपीसीएल वसाहत, गवाणपाडा,बीपीसीएल रिफायनरी,इंडियन ऑइल कॉर्पोरेशन,टाटा पॉवर थर्मल प्लांट,बीएआरसी वरुण बेवरेजेस आणि एम पश्चिम विभागातील माहुलगाव,
आंबापाडा,जिजामाता नगर, वाशी नाका मैसूर वसाहत, खाडी मशीन,आर. सी. मार्ग, शहाजी नगर,लाल डोंगर, कलेक्टर कॉलनी, सिंधी सोसायटी,नवजीवन सोसायटी,ओल्ड बराक चेंबूर छावणी या भागात या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.