सातारा(विजय जाधव) : विविध उपक्रम, योजना राबविण्यात सातारा जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या माण तालुक्यातील आंधळी गावाची ओळख आता अधिक गडद होऊ लागली आहे. पर्यावरण रक्षणात अग्रेसर असलेल्या आंधळी ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ५ हजार वृक्षांची लागवड संकल्पाची पूर्ती केली.गावाने महाश्रमदान करत एकाच वेळी ५ हजार वृक्षारोपण करणारी आंधळी ग्रामपंचायत चर्चेत आली आहे.
सध्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभागी प्रत्येक ग्रामपंचायत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गुणांकन मिळवण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करत आहे. या स्पर्धेत आंधळी गाव एकवटू सक्रिय योगदान देत आहे. रविवार दि.२३ नोव्हेंबर रोजी सर्वम वेल्फेअर फाउंडेशन पुणे आणि आंधळी ग्रामस्थांनी परिपूर्ण नियोजन करून ही वृक्षलागवड केली. यात अनेकांनी आर्थिक आणि साहित्यिक मदतीने या हरितक्रांतीला बळ मिळाले. यात अहिंसा पतसंस्था म्हसवडचे चेअरमन नितीनभाई दोशी, दहिवडीच्या ज्ञानेश्वरी अकॅडमीचे नितीन गभरे यांनी मदती आणि अकॅडमीच्या विद्यार्थी महाश्रमदानात लक्षणीय काम केले.
गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, माजी जि.प. सदस्य अर्जुनतात्या काळे, जि.प. सदस्य मिनाक्षी काळे, विस्तार अधिकारी गंगाराम दडस, अभिजीत भोसले, सविता खरात, सुधाकर काळे, अश्विनी माने, तानाजी काळे, विकास पवार, तानाजी शेंडे, अप्पा गोरे, सागर शेंबडे, जयकुमार काळे, ग्रामविकास अधिकारी विकास गायकवाड, संजय काळे, सतीश शेंडे, सुहास खरात, मल्हारी चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांनी
“माण तालुक्यात समृद्ध पंचायतराज योजनेअंतर्गत अधिकारी, आरोग्य विभाग, कृषी विभाग, बालविकास विभाग, ग्रामपंचायत यांचे संयुक्त प्रयत्न सुरू आहेत. अंगणवाडी, प्राथमिक शाळा, पशुसंवर्धन दवाखाने, ग्रामपंचायत कार्यालय यांचे सक्षमीकरण होत असून सुशासन व लोकाभिमुख कारभाराला प्राधान्य देण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.
आंधळी ग्रामपंचायतीने
कर वसुलीसाठी पुरस्कृत बक्षिसे ठेवून लकी ड्रॉ सारखी लोकाभिमुख अशी अभिनव योजना यशस्वी राबवली.
ग्रामस्तरावर शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे.जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. लोकसहभागातून गावाची आदर्श गाव संकल्पना साकार करण्याकडे वाटचाल सुरू आहे.
दादासाहेब काळे, सरपंच आंधळी




