ताज्या बातम्या

ऐरोली आदिवासी पाडा येथे उपयोगी साहित्याचे वितरण

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने, जीवनज्योती प्रतिष्ठान वाशी आणि नवी मुंबई रिटेल केमिस्ट असोसिएशन या संस्थांच्या माध्यमातून, आदिवासी पाडा यादवनगर ऐरोली येथे आदिवासी महिलांसाठी साडी व इतर उपयोगी साहित्याचे वाटप आणि वृद्ध, वयस्कर व्यक्तींसाठी वॉकर स्टिक/ काठी वाटप तसेच शालेय मुलांसाठी स्कूलबॅग, वॉटरबॅग, वह्या आणि कंपास इ. शालेय वस्तूंचे वाटप नमुंमपा समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री. किसनराव पालांडे यांच्या हस्ते, ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. नैनेश बदले यांच्या सहकार्याने संपन्न झाले. याप्रसंगी जीवन ज्योती प्रतिष्ठान या संस्थेचे संचालक श्री. विजय ताम्हाणे आणि पदाधिकारी श्री. रवी ताजने, श्री. जालिंदर ताजने, श्री. वसंत ताजने, केमिस्ट असोसिएशनचे सचिव श्री. सुनील छाजेड, श्री. भरत दर्जी, श्री. शंकर जेजुरकर, श्री. बाबुराव माने, श्री. गोपाल पाटील उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top