मुंबई — अहिल्यानगर जिल्हा पारनेर तालुक्यात बाबुर्डी गावात चर्मकार समाजाच्या एका महिलेचे जमिनीचे आडवे क्षेत्र शेजारील जमिन मालकाने बेकायदेशीरपणे बांध टाकून उभे केले.अन् याप्रकरणाचा जाब संबंधितास विचारला असता त्यांनी या महिलेला व तिच्या पतीला अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची कथित धमकी दिलेली आहे.हे प्रकरण गेल्या चार पाच महिन्यांपूर्वीचे असुनही याप्रकरणात सुपा पोलिसांनी अजुनही त्या लोकांवर कडक कारवाई केलेली नाही.तरी याप्रकरणी कडक कारवाई करावी अशा मागणीचे एक निवेदन राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मंगळवारी सादर केले आहे.
बाबुर्डी गावात उज्वला बाबा कदम यांचे ७३.५ गुंठे एवढे जमिनीचे आडवे क्षेत्र रस्त्याच्या कडेला गेल्या २३ वर्षांपासून समांतर पसरलेले होते.पण गेल्या जुनमध्ये बेकायदेशीरपणे या जमिनीच्या अर्ध्या भागात दत्तात्रय बबन गाडगे यांच्या कुटुंबाने बांध घातलाअसा आरोप कदम दांपत्याचा आहे.तसेच अर्धा बांध गाडगे कुटुंबाने आपल्या जमिनीत घालून उज्वला कदम यांची रस्त्याच्या कडेला आडवी असलेली जमिन उभी केली.याबाबत कदम दांपत्याने गाडगे कुटुंबास जाब विचारला असता त्यांनी व त्यांच्या साथीदारांनी कदम दांपत्यास अश्लील- अर्वाच्च शिवीगाळ करुन जीवे मारण्याची, शरीरे कापून याच जमिनीत पुरण्याची कथित धमकी गाडगे कुटुब व त्यांच्या साथीदारांनी कदम दांपत्यास दिली.याबाबत सुपा पोलीस ठाण्यात १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत.परंतु या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी काहीही प्रगती केलेली नाही.याकडे राष्ट्रीय चर्मकार संघाने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे लक्ष वेधले आहे.पोलीस महासंचालकांना भेटलेल्या शिष्टमंडळात राष्ट्रीय चर्मकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबुराव माने यांच्या सोबत मुंबई प्रदेशाध्यक्ष विलास गोरेगावकर ,
अशोक देहरे, पंडित कदम ,अनिल ढेरे,दिलीप दडस, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर,शंकर बळी,सुनील पवार आदी सहभागी झाले होते.
उज्वला कदम यांच्या जमिनीचे आडवे क्षेत्र बांध टाकून उभे केल्याप्रकरणी दत्तात्रय बबन गाडगे,छबन बबन गाडगे,प्रणव दत्तात्रय गाडगे,धनश्री छबन गाडगे,विकास नारायण गाडगे, नारायण गाडगे,सिध्दांत शंकर गाडगे,सुनिता शंकर गाडगे,अर्चना दत्तात्रय गाडगे तसेच धनश्रीचे भाऊ व वडील असे १२ जण आणि इतर अनोळखी ६ अशा १८ जणांविरुद्ध गेल्या सप्टेंबर महिन्यातच सुपा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत.परंतु अजुनही या घटनेची वाच्यता झालेली नाही.शिवाय अन्याय झालेल्या महिलेचे बदलेले जमिनीचे क्षेत्र आडवे करुन मिळालेले नाही. म्हणून राष्ट्रीय चर्मकार संघाने पोलीस महासंचालकांचे दरवाजे ठोठावले आहेत,असे माजी आमदार बाबुराव माने यांनी सांगितले.




