ताज्या बातम्या

वाडा कुंभरोशी गणात संजय मोरे यांच्या पाठिंब्या देण्यासाठी सरसावला कांदाटी विभाग..

तापोळा (अजित जगताप) : मुंबई दिनांक महाबळेश्वर तालुक्यातील नैसर्गिक नंदनवन असलेल्या शिवसागर जलाशयामुळे अनेकांना विस्थापित व्हावे लागले. तरीही भूमिपुत्रांची नाळ कायमची जोडली गेली आहे. कांदा टी विभागातील सोळा गावचे अनेक लोक नोकरी व्यवसाय निमित्त मुंबईला आहेत तरी त्यांचे मतदान हे गावी आहे. अशा लोकांनी युवा नेते संजय मोरे यांना वाडा कुंभरोशी गणातून मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार मेळाव्यात केला.

कांदाटी भागातील १६ गावातील मुंबईकर व स्थानिक ग्रामस्थ नेहमी विविध उपक्रम राबवण्यासाठी एकत्र येतात. या एकजुटीच्या वातावरणामुळे या भागात आदरणीय शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली वाटचाल सुरू आहे. महाबळेश्वर तालुक्यातील वाडा कुंभरोशी गणातून शिवसेनेचे इच्छुक उमेदवार संजय मोरे यांना जाहीर पाठिंबा मिळत असल्याने या ठिकाणी बिनविरोध निवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

युवा नेते संजय मोरे यांनी शिवसेना वाढीसाठी तसेच महाबळेश्वर गावचे सुपुत्र व राज्याचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी वाड्या वस्ती व अतिदुर्गम भागामध्ये संपर्क ठेवला आहे. यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी व मुंबईकर मंडळींनी मनोगत व्यक्त केले.
कांदाटी विभागात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे यांच्या प्रयत्नातून विकासकामे मोठया प्रमाणात झाली आहेत. त्यामुळे शिवसैनिक इच्छुक उमेदवार संजय मोरे.. त्यांच्या पाठीशी कांदाटी खोरे …. असे स्लोगन ऐकण्यास मिळत आहे.

यावेळी कांदाटी खोऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री.राजाराम निवळे, श्री विठ्ठल मोरे, श्री.सिताराम शेलार, श्री.गणेश शिंदे,श्री रमेश निवळे श्री. प्रकाश कदम लामजकर ,बबन चव्हाण, श्री. यशवंत चव्हाण, श्री. बबन रा.चव्हाण, अरविंद मोरे, श्री. श्रीरंग निवेळे यांनी संजय मोरे यांना शब्दरूपी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मारुती कदम व आभारप्रदर्शन प्रदिप कदम यांनी केले

युवा नेते संजय मोरे व विशाल बोट क्लब चेअरमन सुभाष कारंडे म्हणजे दुर्गम भागातील प्रसिद्ध शोले चित्रपटातील जय – बिरू जोडी म्हणून काम करीत आहे. मात्र, या भागात ठाकूर, गब्बर, बसंती, सांभा, काल्या, सुरमा भोपळी, राम लाल, चाचा हे पात्र कोणीही नाही. असे विनोदाने बोलले जात आहे.

——- ——- —— ——- —— —– —

फोटो– महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी खोऱ्यातील मुंबई स्थित ग्रामस्थांच्या मालाड येथील मेळावा (छाया– अजित जगताप मालाड)

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top