ताज्या बातम्या

प्रश्नमंजूषा स्पर्धेत रेठरे बुद्रुक गावचे श्री. मोहन दिनकर कदम प्रथम

कराड(विजया माने) : आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्ताने महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ यांनी आयोजित केलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत रेठरे बुद्रूक गावचे य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे टाईम ऑफिसचे क्लार्क श्री. मोहन दिनकर कदम यांनी प्रथम पटकावला. पुणे येथील पारितोषिक वितरण समारंभात देशाचे कृषी खर्च आणि किंमत आयोग (CACP) चे अध्यक्ष विजय पॉल शर्मा व राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे चेअरमन व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे पी.आर. पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व २५ हजार रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जयप्रकाश दांडेगावकर, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, अच्युत गोडबोले, संभाजी कडू पाटील, मंगेश तिटकारे, प्रताप ओहोळ, संजय खताळ यांची प्रमुख उपस्थिती होती. याबद्दल श्री. मोहन कदम (सर) यांचे मनःपूर्वक अभिनंदन. यशवंतराव मोहिते कृष्ण सहकारी कारखाना रे बुद्रुक विद्यमान चेअरमन सुरेश बाबा व संचालक मंडल कराड तालुका आमदार अतुल बाबा भोसले सर्व कृष्णा कामगार बंधु वी टाइगर ग्रुप वाळवा तालुका उपाध्यक्ष शरद निकम आदी उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top