ताज्या बातम्या

जेष्ठ क्रीडाशिक्षक श्री दयानंद पवार सर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी : सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतीला स्मरूण ओंजळ बहुउद्देशीय सामाजिक संस्था सातारा यांच्या वतीने सौ वेणुताई चव्हाण स्मारक सभागृह कराड येथे झालेल्या वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख माननीय श्री अनिल गवस ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी फेम कलाकार उर्फ मामाश्री श्री हंबीरराव मोहिते यांची भूमिका पार पाडणारे माननीय श्री अनिल गवस ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक यांच्या हस्ते श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे कार्यरत असणारे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक माननीय श्री दयानाथ पवार सर यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची नोंद घेऊन श्री पवार सर यांना सरसेनापती हंबीरराव मोहिते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला

श्री दयानाथ पवार सर यांनी 1990 सालापासून या न्यू इंग्लिश स्कूल लावंघर या शाखेवर मुख्याध्यापक म्हणून कामकाज सुरू केले आणि सलग 35 वर्ष शैक्षणिक संस्थेमध्ये ग्रामीण भागामध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य अत्यंत प्रामाणिकपणे कार्यरत आहेत इंग्रजी या विषयामध्ये गेले तीस वर्ष 90% पेक्षा अधिक निकालाची परंपरा कायम राखून वेगवेगळ्या खेळांमध्ये मार्गदर्शन करून शंभरहून अधिक खेळाडू राष्ट्रीय, राज्य, जिल्हा तालुका स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम केले आहे तसेच शिक्षक म्हणून कार्यशील असताना ग्रामीण भागातील वाडीवस्त्यांवरील मुलांना उत्तम इंग्रजी शिक्षण मिळण्यासाठी गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल भोंदवडे या विद्यालयाची स्थापना केली. युवकांना रोजगार मिळावा म्हणून प्रधानमंत्री रोजगार योजना प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे तसेच ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षांचे माहिती व्हावी आणि सामान्य कुटुंबातील मुलांना शासकीय सेवेमध्ये संधी मिळण्यासाठी एकतारा स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले आहे एवढ्यावरच न थांबता इंग्रजी विषयाची पायाभूत तयारी व्हावी म्हणून गरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे मोफत ऑनलाइन मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. उन्हाळी सुट्टीमध्ये विशेषतः मुलींना पोहण्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाते
या सर्व उपक्रमाबरोबरच पवार सर यांनी फळबाग लागवड तसेच सेंद्रिय शेती आणि रानभाजी अभ्यास संवर्धन व रानभाजी लागवड हे पर्यावरणाशी निगडित अत्यंत उत्तम दर्जाचे काम चालू आहे .

अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील अत्यंत उत्तमरीत्या कार्यशील असलेल्या कार्याची दखल घेऊन शिवराजमुद्रा संमेलन कराड येथे सरसेनापती हंबीरराव मोहिते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे
या सन्मानाबद्दल महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि माननीय श्री राजू भैया भोसले माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच श्री समर्थ एज्युकेशन सोसायटी सोनवडी गजवडी या संस्थेचे माननीय उपाध्यक्ष श्री ईसूबभाई पटेल, सचिव माननीय श्री झणझणे सर तसेच सर्व पदाधिकारी आणि संचालक माननीय प्राचार्य श्री मोरे सर , सर्व शिक्षक सहकारी शिक्षकेतर कर्मचारी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर पालक, विद्यार्थी आणि क्रीडा कला पर्यावरण क्षेत्रातील विशेष कार्य करणारे जिल्हा आणि राज्यभरातील मान्यवर यांनी पवार सर यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन केले आहे

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top