सातारा(नितीन गायकवाड) – मुन लाईन हॉटेल येथे झालेल्या पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठकीत रिपब्लिकन सेनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी आयु. विशाल भोसले यांची बहुमताने बिनविरोध निवड करण्यात आली. सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली असून, प्रदेश महासचिव विनोद काळे यांनी या नियुक्तीची औपचारिक घोषणा केली.
यावेळी सातारा जिल्हा महासचिवपदी नितीन रोकडे यांचीही निवड करण्यात आली. बैठकीदरम्यान सातारा जिल्ह्यातील अनेक तरुणांनी पक्षात प्रवेश करून सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
आयु. विशाल भोसले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “रिपब्लिकन सेनेची विचारधारा प्रत्येक घराघरात पोहोचवून, सामाजिक न्याय आणि समतेचा झेंडा उंचावण्याचे काम सातारा जिल्हा जोमाने करेल.”
या प्रसंगी तालुका अध्यक्ष दीपक गाडे, रमेश गायकवाड, सुधाकर देवकांत, सचिन कांबळे (पाटण), जयवंत काकडे, राहुल गायकवाड (फलटण), प्रमोद कांबळे, उमेश वाघमारे (वाई) तसेच महिला अध्यक्ष सुषमा धसके यांसह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
सातारा जिल्हा रिपब्लिकन सेना आता नव्या जोमाने सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होणार आहे.




