कराड : ओंड, ता. कराड येथील रहिवाशी आणि अनेक सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सौ.मधुराणी आनंदा थोरात (वय 43) यांचे मंगळवारी निधन झाले. दैनिक ऐक्य कराड कार्यालय प्रतिनिधी पत्रकार आणि ज्ञानदीप सामाजिक संस्था अध्यक्ष आनंदा थोरात यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले आणि सासू असा परिवार आहे.
एकल महिला संघटन, महिलांचा संपत्ती अधिकार, महिला नेतृत्व विकास, लोकसहभागातून पाणी व्यवस्थापन आणि संविधान जागृती अशा विविध चळवळीत अग्रणी होत्या. महिलांच्या हक्क आणि अधिकारासाठी सतत लढणाऱ्या होत्या. तसेच ज्ञानदीप कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या म्हणून त्या सेवा कार्य करत होत्या. कौशल्य विकास प्रशिक्षणातून महिलांना उद्योजक बनविण्यासाठी त्यांनी कार्य केले होते. अनेक सामाजिक चळवळीत त्यांचा सहभाग होता. विविध गावांतील गरजूंना विशेषतः वंचित घटकांच्या मदतीसाठी आणि त्यांच्या विकासासाठी त्यांचा पुढाकार होता.
विविध संस्था आणि शासकीय समितीमध्ये त्या सदस्य म्हणून काम पाहत होत्या. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.




