Thursday, November 6, 2025
घरमनोरंजनरसिकांच्या उस्फूर्त प्रतिसादाने ‘गौरवगाथा संविधानाची’ला मानवंदना...!

रसिकांच्या उस्फूर्त प्रतिसादाने ‘गौरवगाथा संविधानाची’ला मानवंदना…!

मुंबई(खंडुराज गायकवाड) : काल मुजरेचं केले रे माझ्या मेलेल्या बापाने,…मीआज मुजरे मला करती माझ्या भीमाच्या प्रतापाने!”

या ओळींनी संपूर्ण छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर संविधानाच्या गौरवाने दुमदुमला…

“हरपून भान, केले जीवाचे रान, लिहिलं संविधान!” या काव्यपंक्तींसह संविधानाच्या गौरवगीतांनी रसिकांच्या हृदयात अभिमानाची ज्योत पेटवली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ‘गौरवगाथा संविधानाची’ या कार्यक्रमातून भारतीय संविधानाला साजरी अशी यावेळी मानवंदना देण्यात आली.

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हा भव्य सांस्कृतिक सोहळा छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर, दादर येथे दोन दिवस — ५ आणि ६ नोव्हेंबर २०२५ रोजी रंगणार आहे. पहिल्या दिवसाच्या सादरीकरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीत-गायनाने उपस्थित रसिकांना भावविभोर केले.

कार्यक्रमाचं दिग्दर्शन अमेय पाटील, संगीत संयोजन योगेश पवार, तर सुप्रसिद्ध गायक दिनेश हेलोडे, सचिन आगवणे, नितेश मोरे आणि गायिका संगीता पांचाळ यांनी गायनातून कार्यक्रमाला असामान्य उंची दिली. निवेदन प्रतिक पवार आणि सहकाऱ्यांनी उत्कटतेने सादर करून कार्यक्रमात एक विशेष ओज निर्माण केले.

टाळ्यांचा कडकडाट, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जय घोष, जयभीमच्या गर्जना अन रसिकांच्या डोळ्यातील अभिमानाचे अश्रू — या सगळ्यांनी नाट्यमंदिर दणाणून गेले!

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक श्रीराम पांडे यांनी केले.तर कार्यक्रमाचे प्रेरणास्थान म्हणून संचालक विभीषण चवरे यांनी मार्गदर्शन केले.त्यामुळे कार्यक्रमाचा प्रत्येक क्षण संविधानाच्या मूल्यांना साजेसा ठरला.

🕊 संविधानाच्या गौरवाची ही गाथा म्हणजे केवळ एक सांस्कृतिक सादरीकरण नव्हे — तर भारतीय लोकशाहीच्या आत्म्याला वाहिलेली भावपूर्ण अभिव्यक्ती होती!

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments