ताज्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे सखोल स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न

मुंबई, दि. २ मार्च : आज सकाळी १०.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात सखोल स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. पार्कमधील फेरी मार्ग, मुख्य रस्ते तसेच फुटपाथ या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या उपक्रमात स्थानिक आमदार महेश सावंत, नगरसेविका विशाखा राऊत यांचे पदाधिकारी, अजित कदम तसेच इतर मान्यवरांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. टँकर व जेट मशिनच्या सहाय्याने रस्ते, फेरी मार्ग आणि फुटपाथ धुवून काढण्यात आले. त्यामुळे संपूर्ण परिसर धुळमुक्त आणि स्वच्छ झाल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन (घकव्य) विभागातील सुमारे २५ कामगारांनी स्वीपिंग व ब्रशिंग करून परिसर चकाचक केला. मोहिमेत दोन ई-स्विपर, दोन जेट मशिन तसेच एक लहान आणि एक मोठा अशा दोन टँकरचा वापर करण्यात आला. पाण्याच्या फवारणीद्वारे रस्ते व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
या सर्वंकष स्वच्छता मोहिमेमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाच्या उपक्रमाचे स्वागत केले. परिसर स्वच्छ आणि आकर्षक राहावा यासाठी अशा मोहिमा नियमितपणे राबविण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top