ताज्या बातम्या

पोलीस पाटीलांच्या रिक्त पदे व विविध समस्यांबाबत आमदारांना निवेदन

कराड (अमोल पाटील) : रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी पोलीस पाटीलांच्या रिक्त पदांबाबत तसेच त्यांच्या विविध प्रलंबित समस्यांविषयी शिराळा तालुक्याचे विद्यमान आमदार मा. सत्यजित देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात तालुक्यातील अनेक गावांमध्ये पोलीस पाटील पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजात अडचणी निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच पोलीस पाटीलांच्या मानधन, सेवा अटी, कामाचा वाढता ताण, तसेच इतर विविध मागण्यांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार सत्यजित देशमुख यांनी पोलीस पाटीलांच्या समस्यांची दखल घेत विधानभवनात या विषयावर लक्षवेधी सूचना मांडण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल पोलीस पाटील संघटनेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
निवेदन देण्यासाठी पोलीस पाटील संघटनेचे शिराळा अध्यक्ष विकास शिरसट (आण्णा), उपाध्यक्ष डॉ. सीताराम पाटील व तालुक्यातील इतर गावचे पोलीस पाटील मा. प्रदीप जाधव, भरत चव्हाण, पूनम सावंत, रेश्मा मोरे, विठ्ठल उंडाळकर, शंकर वडार, विजय पाटील, मोहन घागरे, बाबुराव जाधव, सचिन गुरव आदींचा समावेश होता.
या निवेदनासाठी उपस्थित सर्व पोलीस पाटील व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दलही संघटनेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले…

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top