ताज्या बातम्या

WeRmore Solutions Private Limited चा ६ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात; सौ. मानसी पत्याणे ठरल्या पहिल्या ‘करोडपती लीडर’

नवी मुंबई (वाशी) : स्वप्न पाहणाऱ्यांना आणि ती पूर्ण करण्याची जिद्द असणाऱ्यांना भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या WeRmore Solutions Private Limited कंपनीचा ६ वा वर्धापनदिन सोहळा रविवारी, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी वाशी येथील CIDCO Exhibition Centre येथे दिमाखात संपन्न झाला. देशभरातून ५००० हून अधिक सभासदांच्या उपस्थितीत झालेल्या या भव्य कार्यक्रमात विरारच्या सौ. मानसी पत्याणे यांना कंपनीच्या पहिल्या ‘करोडपती लीडर’ म्हणून विशेष सन्मानित करण्यात आले.
सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते Santosh Juvekar तसेच ‘Maharashtrachi Hasyajatra’ फेम Vanita Kharat यांच्या उपस्थितीने रंगत चढली. कंपनीचे सीएमडी मान. श्री. विकास गोपाळ आणि एमडी सौ. प्रिया कड यांच्या हस्ते गौरव सोहळा पार पडला.
महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी संदेश
केवळ तीन वर्षांच्या कालावधीत ‘करोडपती लीडर’ हा मान पटकावणाऱ्या सौ. मानसी पत्याणे यांनी आपल्या मनोगतात महिलांना आर्थिक स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले. “जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती महिला आहे. डायरेक्ट मार्केटिंग क्षेत्रातील संधी ओळखून महिलांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी,” असे त्या म्हणाल्या. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी कंपनीच्या व्यासपीठाला देत भविष्यात स्वतःसारखे अनेक लीडर्स घडवण्याचा संकल्प व्यक्त केला.
‘टीम विनर्स’चा उत्स्फूर्त सहभाग
या सोहळ्यात ‘टीम विनर्स’चा विशेष सहभाग होता. टीममधील १५०० हून अधिक सभासद कार्यक्रमाला उपस्थित होते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ५० लीडर्सना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच उत्तरार्धात झालेल्या ‘लकी ड्रॉ’मध्ये ५३० हून अधिक सभासदांनी आकर्षक बक्षिसे जिंकली.
कार्यक्रमाच्या शेवटी मानसी पत्याणे यांनी महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी असे भव्य आणि सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल कंपनीचे सीएमडी विकास गोपाळ आणि एमडी प्रिया कड यांचे आभार मानले. समाजातील प्रत्येक महिलेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top