मलकापूर(विजया माने) – रोटरी क्लब मलकापूर, स्पेस व्ह्यू इंटेरियर आणि रोटेरियन भगवानराव मुळीक यांच्या संयुक्त विद्यमाने कोटणीस हॉल येथे दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये इको-फ्रेंडली गौरी-गणपती सजावट स्पर्धा तसेच नवदुर्गा सन्मान सोहळा यांचा समावेश होता. दुपारपासून पावसाचा जोर असूनही रोटरीचे सभासद, स्पर्धक व नवदुर्गा मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. कार्यक्रमाची सुरुवात कुंकुमार्चन सोहळ्याने झाली.
रोटेरियन विनोद आमले यांनी प्रभावी प्रस्तावना मांडत उत्तम सूत्रसंचालन केले. स्पर्धकांनी कार्यक्रमाचे कौतुक केले, तर नवदुर्गा सन्मानाने गौरविल्या गेलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचा आनंद झळकत होता.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी परिवारातील महिला सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी आनंदराव बागल, विजय मोहिरे, अरुण यादव, संभाजीराव पाटील, भगवानराव मुळीक, विनोद आमले, अमोल सुतार, संजय बडदरे, राजन वेळापुरे, विजया माने आदी मान्यवर उपस्थित होते.रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल जामदार यांनी रोटरीच्या सामाजिक कार्याविषयी माहिती देत कार्यक्रमांचा उद्देश स्पष्ट केला.सामाजिक भान, सांस्कृतिक उपक्रम आणि महिलांचा गौरव यामुळे रोटरी क्लब मलकापूरचे हे आयोजन विशेष ठरले.