मुंबई : सेनापती बापट मार्गावरील अनधिकृतपणे भरत असलेल्या मासळी बाजारामुळे परिसरातील स्वराज्य सोसायटीमधील रहिवाशांना होत असलेल्या असह्य त्रासाविरोधात आज मोठ्या संख्येने नागरिकांनी जोरदार आंदोलन छेडले. या आंदोलनात विभाग प्रमुख आमदार महेश सावंत, विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर, माजी नगरसेविका प्रिती पाटणकर, शाखाप्रमुख प्रवीण नरे, माजी शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे, महिला शाखा संघटक रीमा पारकर, उपशाखाप्रमुख संदीप पाटील, अजय कौसाले, भाजपचे द.मु.म. सदस्य जितेंद्र कांबळे, अक्षता तेंडुलकर आदी मान्यवर रहिवाशांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते.
“या मासळी बाजारामुळे परिसरात घाण, दुर्गंधी, वाहतूक कोंडी व गंभीर आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा आंदोलकांनी दिला.
या वेळी आमदार विभागप्रमुख महेश सावंत यांनी, “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष रहिवाशांच्या सोबत ठाम उभा आहे,” अशी ग्वाही दिली. रहिवाश्यांना सततचा त्रास या मासळी बाजारामुळे होत आहे. तो कायमस्वरूपी हटवण्याची मागणी आम्ही प्रशासनाकडे करणार आहोत. यावेळी