शिर्डी : बी द चेंज फाउंडेशन, शिर्डी जि. अहिल्यानगर या महाराष्ट्रातील नामवंत सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा शिर्डी साईबाबा देवस्थान मंडळाच्या पालखी निवारा सभागृहात दिमाखात पार पडला.
या सोहळ्यात शिर्डी साईबाबा संस्थानचे कार्यकारी मुख्य अधिकारी यांच्या हस्ते आदर्श शिक्षकांना साईबाबांची शाल, मानाचा फेटा, आकर्षक प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि अँड्रॉइड मोबाईल प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधून प्रत्येकी एका शिक्षकाची निवड करण्यात आली होती. मुंबई उपनगर जिल्ह्यातून श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन, चेंबूरचे मुख्याध्यापक श्री अमोघसिद्ध सीताबाई आप्पाराव पाटील यांना आजपर्यंतच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सोहळ्याला विविध सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांसह शाळेतील अनेक शिक्षक मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल अमोघसिद्ध पाटील यांचा गौरव होताच उपस्थितांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट केला.