कराड : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने देण्यात येणारा प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड येवती गावचे सुपुत्र अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी दिली आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ आणि कोल्हापूरी फेटा असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
स्पंदन ट्रस्टच्या वतीने कला, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, वैद्यकीय, उद्योग, कृषी व क्रीडा, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड देवून गौरवण्यात येते. पत्रकार ज्ञानेश्वर यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले, ते नेहमीच सर्वसामान्य लोकांच्या न्याय व हक्कासाठी आपल्या पत्रकारितेचा उपयोग करतात , त्यांच्या याच कर्तुत्वामुळे त्यांना यावर्षीचा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आदर्श पत्रकारिता हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्काराबद्दल माजी राज्यपाल खा.श्रीनिवासजी पाटील, कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल बाबा भोसले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा, रयत कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील उंडाळकर, यासह येवती ग्रामस्थांनी अभिनंदन केले.