ताज्या बातम्या

राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणासाठी नारायण लांडगे यांची निवड

नवी मुंबई : भारत सरकारच्या सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्र, नवी दिल्ली विभागाच्या (CCRT) वतीने उदयपुर , राजस्थान येथे आयोजित राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी मान्यवर कांशीरामजी हिंदी विद्यालय नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 78 गौतमनगर रबाळे येथे कार्यरत असलेले नारायण वसंतराव लांडगे यांची निवड झाली. सदरील प्रशिक्षणासाठी राज्यातुन दहा शिक्षकांची तर ठाणे जिल्ह्यातून लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीच्या निमित्ताने माजी महापौर सुधाकर सोनवणे, उप आयुक्त (शिक्षण ) संघरत्ना खिल्लारे मँडम , शिक्षणाधिकारी सुलभा बारगरे मँडम, केंद्र समन्वयक रमेश तेली, मुख्याध्यापक जयप्रकाश पाल यांनी अभिनंदन करत प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top