मुंबई (शांताराम गुडेकर) : स्वतंत्र कोकण राज्य अभियान हे कोकणच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी एक व्यापक चळवळ आहे, ज्यात स्थानिक लोकांचा सहभाग आणि त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जातो.यासाठी आपले कोकण वाचविण्यासाठी स्वतंत्र कोकण राज्य असणे गरजेचे आहे.त्यासाठी स्वतंत्र कोकण समितीची स्थापना करुन त्यामाध्यमातून कोकण राज्य अभियान सुरू केले आहे असे प्रतिपादन स्वंतत्र कोकण राज्य अभियान समिती संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांनी केले.
कर्जत येथे संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अरविंद भागवत यांनी उपस्थित मान्यवर संजय कोकरे यांची ओळख करून दिली व त्यांचे स्वागत केले.याप्रसंगी अरविंद भागवत,उल्हास दाबके, सतिश मुसळे, विशाल बांदोडकर, मुरलीधर कलगुटकर,जयेश जाधव उपस्थित होते स्वतंत्र कोकण राज्य अभियान अंतर्गत सामाजिक क्रांतीचा तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करुन उध्वस्त होत असलेल्या कोकण प्रांताला वाचविण्यासाठी कोकण जनतेचा मनातील न्यूनगंड संपवायचा आहे.मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण राज्याना नकाशा बनवुन कोकण राज्याची मागणी केंद्र सरकार आणि राष्ट्रपतीना स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे सादर करण्यात येणार असल्याचे संजय कोकरे यांनी सांगितले.
कोकण वाचविण्यासाठी स्वतंत्र कोकण राज्य असणे गरजेचे- संजय कोकरे
RELATED ARTICLES