Saturday, September 13, 2025
घरमहाराष्ट्रस्वराज्य तोरण संपादक: डॉ.किशोर पाटील यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार २०२५ प्रदान!

स्वराज्य तोरण संपादक: डॉ.किशोर पाटील यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार २०२५ प्रदान!

मुंबई(सतिश पाटील) :

भिवंडी शहरातील स्वर्गीय हाजी अल्लाह दिया अन्सारी फाउंडेशन च्या वतीने दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार विविध मान्यवरांच्या शुभहस्ते शुक्रवार दिनांक १२/९/२०२५ रोजी मंगलमूर्ती सभागृह दांडेकर वाडी कल्याण नाका येथे प्रदान करण्यात आला.
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून सामाजिक शैक्षणिक तसेच पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने चांगले काम करणाऱ्या पत्रकारांचा गौरव
स्वर्गीय हाजी अल्लाह दिया अन्सारी फाउंडेशन च्या वतीने
करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी पूर्वचे माजी आमदार श्री. रुपेश लक्ष्मण म्हात्रे, राष्ट्रवादीचे नेते सोहेब गुड्डू, अब्बू जफर हसन नडवी (मुंबई ज्येष्ठ पत्रकार) मौलाना आसद काजमी
(मुंबई ज्येष्ठ पत्रकार)शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उल्हासनगर प्रमुख श्री राजेंद्र चौधरी, चित्रपट डायरेक्टर श्री ईश्वर सिंग, अब्दुल सईद मिठाईवाला, सुलेमान उस्मान मिठाईवाला, ज्येष्ठ पत्रकार मुंबई सहीद अहमद, भाजपा अध्यक्ष श्री फजलू अन्सारी, ज्येष्ठ पत्रकार शकील रशीद मुख्य संपादक (मुंबई उर्दू न्यूज, दैनिक मुंबई,)
स्वर्गीय हाजी अल्लाह दिया अन्सारी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.झियाहुल हसन अन्सारी,स्वर्गीय हाजी अल्लाह दिया अन्सारी फाउंडेशनचे ठाणे जिल्हाध्यक्ष श्री.जय रामदास प्रतापराय खत्री, आदी मान्यवर व मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री सीमाब अनवार यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वर्गीय हाजी अल्लाह दिया अन्सारी फाउंडेशन
च्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. सदर पुरस्कार मिळाल्यामुळे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील यांचे
समाज कल्याण न्यासचे संस्थापक अध्यक्ष
धर्मसेवक डॉ.सोन्या काशीनाथ पाटील,मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.श्री.मनीलाल रतिलाल शिंपी, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर चे अध्यक्ष संजयजी शेंडे,उपाध्यक्ष श्री. पी. एस. महाजन,सचिव श्री. श्याम फाळके,प्रशिक्षण प्रमुख श्री. दिपक पोहरे,ठाणे,नवी मुंबई विभागीय समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) श्री.दिलीप स्वामी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव डॉ.यशवंत अनंत म्हात्रे,समाजसेवक , उद्योजक डॉ.रामचंद्र देसले,उद्योजक समाजसेवक डॉ.किशोर अढळकर,स्वामीनारायण मंदिर हॉल ट्रस्टचे. डॉ. दिनेश भाई ठक्कर,लेडीज एक्स्प्रेस च्या प्रमुख श्रीमती मधुबेन ठक्कर, रोटी डे ग्रुप चे निखील चंदेईया, कच्छ युवक संघाचे तरुण नागडा, पोलीस पाटील संघाचे माजी अध्यक्ष तथा आदित्य टाइम्सचे संपादक ॲड. सोमनाथ बाळाराम ठाकरे,व स्वराज्य तोरण मित्र परिवाराकडून
त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments