ताज्या बातम्या

भारतामध्ये पहिल्यांदाच दुर्मिळ लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेने कासवाला चार अंड्यांपासून वाचवले; ‘श्री’ला नवे जीवनदान

पुणे : भारतात पहिल्यांदाच पुण्यातील ‘द स्मॉल अ‍ॅनिमल क्लिनिक’मध्ये एका मादी कासवावर लॅप्रोस्कोपिक पद्धतीने एग-बाइंडिंग शस्त्रक्रिया करून चार पूर्ण विकसित अंडी काढण्यात आली. ‘श्री’ नावाच्या कासवाला गेल्या दोन महिन्यांपासून खाण्याची इच्छा नसणे, सुस्ती आणि सूज अशा त्रासांनी ग्रासले होते. तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून ती पुन्हा पूर्ववत सक्रिय झाली आहे.

या दुर्मिळ प्रक्रियेत यकृत वाढलेले असताना, कमी हिमोग्लोबिनच्या स्थितीतही चार अंडी सुरक्षितपणे काढण्यात आली. या शस्त्रक्रियेत डॉ. नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली सेव्होफ्लुरेन गॅस अ‍ॅनेस्थेसिया आणि GE620 व्हेंटिलेशनचा वापर करण्यात आला. पारंपरिक पद्धतीत कवच कापावे लागते, परंतु या पद्धतीमुळे श्रीचे कवच सुरक्षित राहिले आणि संसर्गाचा धोका टळला.

शस्त्रक्रियेनंतर श्रीने एका तासात खाणे सुरू केले व सक्रिय हालचाल सुरू झाली. तिच्या पालकांनी आनंद व्यक्त करत डॉक्टर व टीमचे आभार मानले. ही प्रक्रिया पशुवैद्यक क्षेत्रात मैलाचा दगड ठरली असून, कासवाच्या आरोग्यासाठी नवे दालन खुले केले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top