प्रतिनिधी : क्रांतीसम्राट डॉ. बाबासाहेब गोपले जयंती महोत्सव समिती मुंबई च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे निर्माते क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाचे जनक क्रांतीसम्राट डॉ. बाबासाहेब गोपले यांची ७२ वी जयंती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह भायखळा येथे उत्साहात साजरी झाली.कार्यक्रमांचे आयोजन मातंग समाजाचे नेते समाजभूषण सुदाम आवाडे , मोहन तुपसौंदर्य , सुनिता तुपसौंदर्य यांनी केले. यावेळी बी.जी. गायकवाड , शंकरराव साठे , अशोक ससाणे. माणिकराव साठे , श्रावण नाटकर , योगेश शिंदे , दत्ता आव्हाड , श्रीकांत शिंदे , संजु साठे , वसंत साळवे , तुलसिराम ताटे , विजय चव्हाण , गुलाब इचाळ , राहुल गोपले , दिनेश पांजगे. ,दत्तात्रय आवाडे , छबूबाई सुर्यवंशी , आशा शिंदे आधी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब गोपले जयंती उत्साहात साजरी
RELATED ARTICLES