ताज्या बातम्या
साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी… साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी, अननस खरेदीसाठी ग्राहकांची गर्दीनारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त कोपरखैरणेत रंगले ‘खुले कवी संमेलन’; सौ. जयश्रीताई पाटील यांचा विशेष सन्मानआदानींच्या पथदिव्यांनी बोरीवली पूर्व उजळले ; नागरिकांना दिलासाराष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर‘थँक्यू आई-बाबा!’… चिमुकल्या स्पंदनच्या पत्राने पालकांचे डोळे पाणावले; साहित्यापेक्षाही मौल्यवान ठरली मुलाची कृतज्ञता; पोस्टातून आलेल्या पत्राने दाटला पालकांचा कंठ

..आणि युवासेनाप्रमुख आ.आदित्य ठाकरे यांनी घेतला चक्क सेल्फी

प्रतिनिधी : युवासेनाप्रमुख आ.आदित्य ठाकरे काही दिवसापूर्वी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर होते. पाटण तालुक्यातील विश्वविक्रमवीर डाकेवाडी (काळगाव) येथील कलावंत संदीप डाकवे यांनी आदित्य ठाकरे यांचे स्केच तयार केले होते. ते त्यांना ठाकरे यांना द्यायचे होते. तळमावले या ठिकाणी सभा संपल्यानंतर गर्दीतून वाट काढत आदित्य ठाकरे त्यांच्या गाडीत जावून बसले. गाडीला लोकांचा वेढा होता. याचवेळी जाताना “आपणास एक स्केच द्यायचे आहे ?” असे आ.आदित्य ठाकरे यांना सांगितले. युवासेनाप्रमुख यांना स्केच देता येणार नाही असे संदीप डाकवे यांना वाटल्याने ते तिथून जात असतानाच काही लोकांनी डाकवे यांना आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या दरवाजाजवळ नेले. सुरक्षा रक्षकांच्या वेढ्यातून संदीप डाकवे यांनी आ.आदित्य ठाकरे यांना स्केच दिले. परंतू फोटो काढायला त्यावेळी कुणीच नव्हते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी संदीपना “मला तुमचा मोबाईल सेल्फी मोड ला टाकून माझ्याकडे द्या, मी फोटो काढतो” असे सांगितले. डाकवे यांनी मोबाईल सेल्फी मोडला टाकून त्यांच्याकडे दिला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी चित्राची फ्रेम, स्वतःचा आणि संदीप डाकवे असा छान सेल्फी घेतला. आ.आदित्य ठाकरे यांच्या या समयसुचकतेचे सर्वांनाच कौतुक वाटले. कलेची दाद दिल्याबद्दल लोकांनीही समाधान व्यक्त केले.

Scroll to Top