Tuesday, June 24, 2025
घरमहाराष्ट्रमानद डॉक्टरेट" पदवीने सांगलीचे प्रसिद्ध लेखक, सामाजिक कार्यकर्ते हिंदरत्न दिपक लोंढे सन्मानित*.!

मानद डॉक्टरेट” पदवीने सांगलीचे प्रसिद्ध लेखक, सामाजिक कार्यकर्ते हिंदरत्न दिपक लोंढे सन्मानित*.!

कराड/सांगली(विजया माने) : महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील प्रसिध्द कवी, लेखक, सामाजिक कार्यकर्ते हिंदरत्न दिपक लोंढे यांच्या साहित्यसेवा आणि समाजसेवाकार्याची दखल घेऊन, युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबो, श्रीलंका व भारत ह्युमन राईट फाऊंडेशन, भारत यांचे संयुक्त विद्यमाने हिंदरत्न दिपक लोंढे यांना, लाखो भक्तांना अध्यात्मिक शिकवण आणि जीवनाची प्रेरणा देणारे, १३ व्या शतकातील महान मराठी संत, संत ज्ञानेश्वर यांचे विश्रांतीस्थान तथा संजीवन समाधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील आळंदी देवाची या पवित्र ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजक मा. डॉ. आकाश पुजारी, संयोजक पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ, माथूराचे मा. डॉ. किरण बोंगाळे, धर्मादाय आयुक्त मा. डॉ. दुधभाते, ओ. जि. सी. सी. संस्थेच्या संस्थापक मा. डॉ. वैष्णवी अय्यर आणि ईगल ग्रुपचे सीईओ डॉ. बी. काटकर यांचे शुभ हस्ते “मानद डॉक्टरेट” ही अत्युच्च मानाची अलौकिक पदवी देऊन, सन्मानित करण्यात आले.
हिंदरत्न दिपक लोंढे हे दिपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, सांगली. महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष असून, अनाथांची माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजसेविका पत्नी शारदा लोंढे यांचे सहकार्याने, मानव समाजातील दीन दुबळे, बेघर, निराधार वृद्धमायबाप यांची मनोभावे सेवा शुश्रूषा करण्याच्या मुख्य उद्देशाने, सांगली जिल्ह्यातील मिरज येथे हे दांपत्य “शारदा वृद्धसेवाश्रम” या नांवाने वृद्धाश्रम चालवतात. शैक्षणिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन मदतीसाठी नेहमीच धावून जाणारे लोंढे दांपत्य यांनी आपल्या समाजसेवाकार्याचा समाजापुढे एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. आजअखेर त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
आपल्या मातृभूमितील सर्वच राष्ट्रसंत, राष्ट्रपुरुष, देशवासी, नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतक व ज्यांची मी निस्वार्थपणे मनोभावे अहोरात्र सेवा शुश्रूषा करतोय अशा माझ्या सर्व निराधार, बेघर, अनाथ, वंचित व उपेक्षित वृद्ध मायबाप आणि लेकरांना मी माझ्या अंत:करणापासून धन्यवाद देतो. कारण ही अति महान पदवी मला आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच मिळाली आहे.
संपूर्ण देशवासीयांच्यासह विशेषतः माझी जन्मदाती कष्टाळू आई श्रीमती भागीरथी लोंढे, खऱ्या अर्थाने मला जगणं शिकविणारी माझी आजी कै. गंगुबाई थोरात (अक्का) आणि जिने मला निस्वार्थ समाजसेवा शिकविली ती माझी सहचारिणी अर्थात अनाथांची माई शारदा लोंढे यांना ही “मानद डॉक्टरेट पदवी” समर्पित करत आहे. असे हिंदरत्न दिपक लोंढे यांनी आपले मत व्यक्त केले.
अशोका हॉटेल, आळंदी देवाची, पुणे येथे पार पडलेल्या या भव्यदिव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. गायत्री कुंदे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आयोजक डॉ. आकाश पुजारी आणि परिवार यांनी सर्व मान्यवर पाहुणे आणि पुरस्करार्थी यांचे स्वागत केले. आभार मानले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments