मुंबई (शांताराम गुडेकर) : अपना बाजार आर.सी.एफ. शाखा चेंबूर यांच्या ५९ व्या वर्धापन रविवारी (१जून )मोठया थाटामाटात संपन्न झाला.या वर्धापन दिनानिमित्त संस्थेचे संचालक श्री.अनिल ठाकूर सपत्नीक उपस्थितीत होते.तसेच शाखेचे पालक मंत्री श्रीभीमसेन आचरेकर,अध्यक्ष सौ.शोभना हेगडे व सदस्य श्री.प्रदीप गावंड, शाखा व्यवस्थापक श्री. रवींद्र लोटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अपना बाजार आरसीएफचे ग्राहक निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्री.सतीश चौधरी यांनी अपना बाजार आरसीएफचे कौतुक करत पुढील उपक्रम आणि लोकसेवा कार्यास यानिमित्त शुभेच्छा दिल्या.तसेच या सुवर्ण दिनी शाखेचे सेवक श्री.प्रमोद महाडेश्वर यांचाही ५९ वा वाढदिवस होता. तो सेवक कु. पूजा राऊळ, कु.खेतना राणे.कु.हेमा चौहान,श्री.श्रीकांत कासार,श्री.राजू पाटील यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.




