ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात प्रतिज्ञा

प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटरमध्ये दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार यांच्यासमवेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.सत्यवान उबाळे, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, लेखा अधिकारी श्री.विजय रांजणे, सहा.आयुक्त श्रीम. अलका महापूरकर, श्रीम.स्वरूपा परळीकर, श्री.अरूण पाटील, इस्टेट मॅनेजर श्री.अशोक अहिरे, प्रशासकीय अधिकारी श्री.संजीव पवार आणि उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी सामुहिक प्रतिज्ञा ग्रहण केली. यावेळी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याव्दारे, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करीत आहोत अशी प्रतिज्ञा घेत महापालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाने आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करू, तसेच मानवी जीवित आणि मूल्य धोक्यात आणणाया विघटनकारी शक्तीचा प्रतिकार करू असा प्रतिज्ञेचा मजकूर सामुहिकरित्या म्हटला.

Scroll to Top