ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्बच्या धमकीने कामकाज ठप्प…

सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यातील अनेक परवाने व कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करणाऱ्या सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात नेहमीच वर्दळ असते. शासकीय व खाजगी वाहनांच्या ताफ्यातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. अशातच सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्बच्या धमकीने दुपारचे कामकाज ठप्प झाले. एवढेच नव्हे तर जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. दिवसभर चर्चेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज चांगलेच ठप्प झाले होते.

अखेर सर्व दक्षता यंत्रणेने परिसरात संपूर्ण शोध घेऊन बॉम्ब नसऱ्याची खात्री पटवून घेतली. त्यानंतर कर्मचारी व लोकांची वर्दळ सुरू झाली. सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी नेहमीच्या पत्रकारांशी संवाद साधला. व माहिती दिली.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील काही लोकांनी सांगितले की बुधवार दिनांक २१ मे रोजी दुपारी अचानक सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस वाहने व अग्निशामक दल त्याचप्रमाणे बॉम्बशोधक श्वान पथक दाखल झाले. कोणतीह पूर्व सूचना न देता जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या कर्मचारी व नागरिकांना बाहेर जाण्याची विनंती करण्यात आली. नेमके काय घडले? याची कुणालाच माहिती देण्यात येत नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अँटी करप्शनची खूप मोठी धार पडल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर मार्क डील सुरू असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
प्रत्यक्षात मात्र आज दुपारी ३.१५ वाजता सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब दे उडवून देणार असल्याची ई-मेल वरून अज्ञात व्यक्तीने चेन्नई वरून धमकी दिल्याची बाब उघडकीस आली. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस छावणीचे स्वरूप आल्यामुळे अनेक जण विचारपूस करत होते. त्यातच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळल्यामुळे खूप मोठे संकट आल्याचे वातावरण निर्माण झाले होते. ते अखेर निवाळले. तसेच पावसाचा जोर ओसरण्याने पुन्हा एकदा वाहतूक सुरू झाली.
सातारा पोलिसांच्या वतीने दक्षतापूर्वक खबरदारीची उपायोजना करण्यात आली असली तरी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक जण निवेदन देतात. आंदोलन करतात. पण, त्याची फारशी गंभीर दखल घेतली जात नाही. अशी नेहमीच तक्रार ऐकू येते. मात्र, एक ईमेलमुळे सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा फौज फाटा उभा करण्यात आला होता. याबाबत जिल्हाधिकारी परिसरातील लोकांनी समाधान व्यक्त केले. तसेच काहींनी आपले आंदोलन पुन्हा नव्या जोमाने सुरू केले.

_____________________________
फोटो– सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस छावणीचे स्वरूप…( छाया– अजित जगताप सातारा)

Scroll to Top