Friday, June 20, 2025
घरमहाराष्ट्रपालघर ला नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर ---- परिवहन मंत्री प्रताप...

पालघर ला नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर —- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई : आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या पालघरला नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाले असून आता पालघर जिल्ह्याला MH-60 हि नवीन परिवहन ओळख मिळाली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, ९ एप्रिल रोजी संपर्कमंत्री या नात्याने पालघर येथे झालेल्या लोकदरबारामध्ये लवकरच पालघर मधील नागरिकांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात येईल असे आश्वासन मी दिले होते .त्याची पूर्तता या निमित्ताने होत असून पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला यापुढे परिवहन विषयक कामासाठी वसई -विरार ला जाण्याची आता आवश्यकता भासणार नाही. सहाजिकच त्यांच्या वेळ,श्रम आणि पैशाची बचत होणार आहे.
पालघरला ” उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ” मंजूर करण्यासाठी तातडीने कार्यवाही केल्या बद्दल राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले आहेत. या संदर्भातील शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

(अभिजीत भोसले)
जनसंपर्क अधिकारी
मा. मंत्री परिवहन

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments