Wednesday, November 5, 2025
घरमहाराष्ट्रसदिच्छा सामाजिक संस्थेच्या वतीने संयुक्त जयंती महोत्सव व पुरस्कार प्रदान सोहळा

सदिच्छा सामाजिक संस्थेच्या वतीने संयुक्त जयंती महोत्सव व पुरस्कार प्रदान सोहळा

प्रतिनिधी, मुंबई – धारावी माटुंगा विभागातील सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रस्थानी असलेल्या सदिच्छा सामाजिक विकास संस्था ही गेली १० वर्षे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करत आली आहे. याच परंपरेनुसार यावर्षीही संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा सोहळा शनिवार, दिनांक १७ मे २०२५ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, माटुंगा लेबर कॅम्प येथे पार पडणार असून, कार्यक्रमाला अनेक मान्यवर पाहुणे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून दलित पँथरचे नेते अॅड. कीर्ती डोले, खासदार वर्षाताई गायकवाड, आमदार ज्योतीताई गायकवाड, महेश सावंत, समाजसेवक आशिष मोरे, तसेच मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आयु. सिद्धार्थ कांबळे हे या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

या वेळी खालील नामवंत व्यक्तींना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे:

  • जीवन गौरव पुरस्कार – आयु. तजीलाबाई खैरमोडे
  • समाज गौरव पुरस्कार – आयु. राजेंद्र नायकर, ए. रविचंद्रन
  • समाज भूषण पुरस्कार – आयु. मनोहर मोरे
  • कलावैभव पुरस्कार – सुप्रसिद्ध निर्माते राहुल भंडारे
  • धम्म प्रेरणा पुरस्कार – कु. पल्लवी राजू जाधव, कु. चैतन्य राजू जावळे

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सुनील कांबळे आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व समाज बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments