सातारा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे देश अखंड आहे. तो अखंड राहणार आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष श्री रमेश उबाळे यांनी डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा हाती दिली आहे. त्या युगपुरुषाचे विचार आमच्या मनात कायम आम्ही जतन करत आहोत. असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन व माजी सैनिक कल्याण विभाग मंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी सातारा येथे केले.
पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महायुतीच्या घटक पक्षाचा घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व संविधान उद्देशिका प्रत स्वीकारताना मंत्री नामदार देसाई बोलत होते. भारतीय संविधानात कुणीही बदलू शकत नाही कारण जब तक सुरज चांद रहेगा… संविधान कायम रहेगा.. आता प्रत्येकाच्या मनात कोरले गेले आहे. राजकीय विरोधकांनी कितीही अफवा पसरवल्या तरी संविधान बदलणार ही अफवा राहणार आहे. या वेळेला पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते व महायुती घटक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत प्रयत्न केले .
सातारा जिल्हा हा महायुतीयुक्त जिल्हा झालेला आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टी व महायुती आम्ही सरकारमध्ये सत्तेत सहभागी आहोत. तेवढ्यात ताकतीने सामान्यांची कामे करण्यासाठी आदरणीय नेते जोगेंद्र कवाडे सर व युवा नेते जयदीप कवाडे आणि श्री रमेश उबाळे हे नेहमीच सतर्क असतात. सत्तेच्या माध्यमातून प्रश्न सोडवत असताना वेळेप्रसंगी आंदोलनाची ही श्री उबाळे हे सातारा जिल्ह्यात तयारी करतात आणि प्रश्न सोडवून घेतात.
पाटण मतदार संघामध्ये त्यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून मताधिक्य देण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले आहे. असे यावेळी श्री देसाई यांनी स्पष्ट केले.
श्री रमेश उबाळे यांच्यासारखा सर्व जाती धर्मातील समाजासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याला सत्तेच्या माध्यमातून ताकद दिली जाईल असे सांगून त्यांनी कोणत्याही अडीअडचणीच्या वेळेला राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून म्हणून मी जबाबदारी स्वीकारली आहे .असे त्यांनी स्पष्ट केले.
_____________________
फोटो— राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना घटनाकार डॉ आंबेडकर यांची प्रतिमा भेट देताना श्री रमेश उबाळे….. (छाया निनाद जगताप– सातारा )