Wednesday, June 25, 2025
घरमहाराष्ट्रमहाबळेश्वर महापर्यटनाने पाचगणी परिसरातही पर्यटकांचा महामेळा...

महाबळेश्वर महापर्यटनाने पाचगणी परिसरातही पर्यटकांचा महामेळा…

महाबळेश्वर

(अजित जगताप) : उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना शरीर व मनाला उत्साहित करण्यासाठी महाबळेश्वर महा पर्यटनाने पाचगणी परिसरातही पर्यटकांचा महामेळा भरल्याचे चित्र दिसत आहे. महाबळेश्वर मधील गर्दीतून बाहेर पडल्यानंतर थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या पाचगणी परिसरातील हॉटेल व रिसॉर्ट यामध्ये पर्यटकांचा महामेळा भरला आहे. निसर्गाच्या सानिध्यात पर्यटकांना आनंद पाहून अनेक व्यावसायिक सुद्धा या महाबळेश्वर महा पर्यटनाबाबत धन्यता मानत आहेत.
महाबळेश्वर येथे आयोजित पर्यटन उत्सवाचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासारखे देखणे नियोजन केले आहे.पर्यटनासाठी एखादी ऑलंपिक स्पर्धा होत असल्याचा भाग थंड हवेच्या ठिकाणी जाणवू लागलेला आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या तर्फे आयोजित दि. २ ते ४ मे या कालावधीत महापर्यटन उत्सव महाबळेश्वर मध्ये भरले आहे. शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे नेहमीप्रमाणे पर्यटकांची गर्दी झाली आहे. डझनभर व्हीआयपी मंडळी व त्यांच्या बंदोबस्तासाठी असणारे पोलीस यामुळे पर्यटकांना सुद्धा सुरक्षा कवच लाभलेले आहे. महाबळेश्वर तालुक्याचे भूमिपुत्र व राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते महा पर्यटन महोत्सवाचे मोठ्या उत्साहात उद्घाघाटन झाले. या प्रसंगी पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, आ. तुकारात ताके, पर्यटन विभागाचे महाव्यवस्थापक मनोजकुमार सुर्यवंशी, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, प्रभारी पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, सातारा जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, पर्यटन विभागाचे संचालक बी.एन. पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, महाबळेश्वर तहसीलदार तेजस्वीनी पाटील, ब्रॅन्ड ॲम्बेसिडर मृणाली देव-कृलकणी, नवेली देशमुख, जपानचे कॉन्सुलेट जनरल यमाशिता सान आदी उपस्थित होते.
महाबळेश्वर-पाचगणी परिसरात पुणे मुंबई येथून अनेक पर्यटकांनी आपल्या पर्यटनाची आगाऊ आरक्षण करून ठेवल्यामुळे त्यांचा पर्यटनाचा आनंद द्विगणित झालेला आहे. पाचगणी, खिंगर, दांडेकर, मेटगुताड ,भोसे अवकाळी परिसरातील अनेक हॉटेल पर्यटकांनी गजबजून गेलेले आहे. फिंगर येथील हेरिटेज रिसॉर्ट पाचगणी या ठिकाणी पर्यटकांनी महा पर्यटनाचा आनंद घेऊन खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील निसर्ग सौंदर्य पाहण्याचे भाग्य लाभले असल्याची प्रतिक्रिया दिलेली आहे. या हॉटेलमध्ये नेहमीच पर्यटकांची काळजी घेतली जाते तसेच निसर्गरम्य परिसरामध्ये ऑक्सिजनचा ही पुरवठा होत असल्याने खऱ्या अर्थाने शरीराची शुद्धीकरण झाल्याची माहिती महापरिनर्तनासाठी आलेल्या श्री पाटणकर व श्री गुजर कुटुंबीयांनी दिली. मध्य प्रदेश हरियाणा गुजरात तामिळनाडू कर्नाटक ते थेट गोवा येथून पर्यटक या हॉटेलमध्ये मुक्कामासाठी आले होते.

विविध साहसी उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम, किल्ले आणि शास्त्रप्रदर्शनी, फूड फेस्टिव्हल, साहसी खेळांचे उपक्रम, हेलिकॉप्टर फेरी पर्यटकांसाठी नाविन्यपूर्ण झाली आहे. विविध चवदार पदार्थ, मिलेटचे पदार्थ, औषधी पदार्थ त्याची चव अनेक पर्यटकांच्या जिभेवर रेंगाळत आहे. महिला बचत गटाच्या स्टॉलला व्यवसायिक यश मिळाले आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी फुड फेस्टीवल, फ्ली बाजार, कीड्स झोन, वेण्णा लेक येथील तरंगता बाजार, प्रतापसिंह उद्यान आदी ठिकाणी भेटी दिल्या. गोल्फ क्लब येथे उभारण्यात आलेल्या टेंट सिटीला भेट दऊन पर्यटकांशी ही संवाद साधला या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी सुरक्षा दलाचा शुभारंभही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केला. या महाबळेश्वर महापर्यटन महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात विविध जबाबदारीसाठी एजन्सी नेमल्यामुळे स्थानिकांना मात्र हा पर्यटन उत्सव फक्त डोळ्याने पाहण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

______________________________

फोटो महाबळेश्वर महा पर्यटन महोत्सवा चे उद्घाघाटन व पाहणी करताना मान्यवर आणि हॉटेलमध्ये महोत्सवाची चर्चा करताना पर्यटक (छाया- अजित जगताप महाबळेश्वर)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments