Wednesday, June 25, 2025
घरमहाराष्ट्रसत्यशोधक विचारक्रांती महासंघ सर्वसामान्यांचे विचारपीठ - विजय दणाणे

सत्यशोधक विचारक्रांती महासंघ सर्वसामान्यांचे विचारपीठ – विजय दणाणे

कराड (विजया माने) : येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावर असणाऱ्या टेके आय क्लिनिक या हॉस्पिटलच्या हॉलमध्ये स्वामी विवेकानंद सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संचलित सत्यशोधक विचारक्रांती महासंघ या संघटनेचा संवाद मिळावा तसेच मोफत नेत्र तपासणी असा कार्यक्रम आयोजित केला होता सदर कार्यक्रमांमध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय दणाणे हे अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अजय सिद, रोहित सुवासे उपस्थित होते. अध्यक्ष भाषणात विजय दणाणे म्हणाले की, सातत्याने समाज परिवर्तनाचे काम करत असताना गेले अनेक वर्ष या फाउंडेशन सोबत विविध विचारधारेतील असंख्य कार्यक्रम करून समाजाला न्याय देण्याचा दृष्टीने सदैव आम्ही प्रयत्न केला. मात्र प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार प्राप्त करून देणारी एकही चळवळ निदर्शनात न आल्याने एक वैचारिक भूमिका घेऊन स्वतंत्रपणे कार्य करणारे सत्यशोधक विचारक्रांती महासंघ हे सर्वसामान्य जनतेचे विचारपीठ आहे अशी त्यांनी भूमिका मांडली.
मनोगत व्यक्त करताना महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजनाताई माळी म्हणाल्या की या फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना चांगली सुवर्णसंधी मिळालेली आहे आणि महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने पुढील काळात प्रयत्न करू. यासह सदर कार्यक्रमात टेके आय क्लिनिक या हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच सर्व पदाधिकारी यांना भारतीय संविधान आणि विचारवंतांचे चरित्रे भेट करण्यात आली. नूतन निवडी झालेल्या रंजना माळी, सोनाली कोळी, कविता घस्ते, निशा वळवडे, अरुणा कांबळे, विजया माने, शामल माने, सविता पाटील, विचार पिठावरील मान्यवरांसह बाळासाहेब चव्हाण, संपत कांबळे, संदीप घस्ते, अरुण पाटील, संभाजी मस्के, नेताजी दाभाडे, गौरव कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments