प्रतिनिधी : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले जयंतीचे औचित्य साधून शिवाजी काका ग्रुप तर्फे दुबईमध्ये भव्य दिव्य व लेझीमच्या गजरात जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता दिनांक २१ एप्रिल 2024 रोजी हा सोहळा ग्लॅण्डले इंटरनॅशनल स्कूल दुबई येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे नियोजन शिवाजी काका ग्रुप मधील तमाम भगिनी महिला यांच्या सहकार्याने व एकजुटीने संपन्न केले. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री चंद्रशेखर जाधव,श्री अभिजीत देशमुख,प्रवीण वराडकर,डॉक्टर अनिल बनकर,रत्नाकर दंडवते,उदय मोरे, रमा काळे,सुलोचना मुंगे यांनी आपला अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमास उपस्थिती लावली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूचना नाईक. सौ साक्षी गणेश मोरे व शिवाजी काका ग्रुपचे अध्यक्ष श्री शिवाजी काका नरूणे यांनी केले. तसेच या कार्यक्रमांमध्ये रोषणाई आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना बहारदार कार्यक्रम आणण्यासाठी डीजे निखिल यांचा मोठा सहभाग लाभला.
सागर जाधव ( एस.जे.लाईव ) यांनी हा कार्यक्रम फेसबुक लाईव माध्यमातून जगातील सर्व समाज बांधवन पर्यंत पोहचविला
श्रीमंत ढोल ताशा पथक यूएई चे वादन हे कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले,कार्यक्रम खूप रंगतदार विविध कलांनी नटलेला होता, आपल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन, नव्या पिढीसमोर आपल्या थोरवीरांच्या गाथा आणि त्यांची महती सादर करण्यात आली, जेणेकरून आपल्या पिढीला आपल्या वीर लोकांची माहिती मिळेल. या कार्यक्रमांमध्ये श्री रत्नाकर दंडवते,डॉक्टर अनिल बनकर,उदय मोरे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महती अभ्यासपूर्वक सगळ्यांसमोर मांडली.कार्यक्रमांमध्ये विविध नृत्य,आंबेडकरांवरील गीते, पोवाडा व असे इतर बहारदार कार्यक्रम झाले. दुबईतील तमाम मराठी बांधवांनी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. शिवाजी काका गृह एक सामाजिक महिलांसाठी मदतीस तत्पर असलेला ग्रुप आहे. या प्रसंगी महिलांना गोल्डन ग्लोरी टेकनिकाल कंपनी तर्फे लॉन्ग सर्विस अवॉर्ड प्रदान करून त्यांना गौरवण्यात आले व त्यांनी घेतलेल्या मेहनतीची व कष्टाची नोंद घेण्यात आली
शिवाजी काका ग्रुपमध्ये दुबई सारख्या ठिकाणी घरकामे करून आपला संसाराला हातभार लावणारा महिलांचा सहभाग आहे. आपल्या कामातून वेळात वेळ काढून हा कार्यक्रम सर्व महिलांनी मिळून सादर केला आणि समाजाला दाखवून दिले की आम्हीही आपल्या समाजातील एक अविभाज्य घटक आहोत.
वरील कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयोजक, शिवाजी नरूणे,साक्षी मोरे,सूचना नाईक,विठोबा अहिरे व सहकारी चंद्रशेखर जाधव,संतोष भस्मे,मिलिंद मानके,किशोर मुंडे व इतर सर्व सहकार्यांनी अथक मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
दुबईत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
RELATED ARTICLES