मुंबई :प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत गेल्या आठवडाभरात एक आगळंवेगळं आणि भावनिक उंची गाठणारं प्रदर्शन पाहायला मिळालं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासाच्या प्रत्येक पायरीला स्पर्श करणाऱ्या मातीकलशांचे आणि त्यांच्या वापरलेल्या वास्तूंच्या आठवणी जागवणाऱ्या वस्तूंचे हे प्रदर्शन होतं.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यभरात जेथे जेथे पाय ठेवले, त्या प्रत्येक ठिकाणची माती एकत्र करून कलशात ठेवण्यात आली होती. या कलशांसोबतच त्यांनी वापरलेल्या वस्तू, वास्तू आणि आठवणींनी सजलेलं हे प्रदर्शन जिज्ञासूंना एका ऐतिहासिक आणि प्रेरणादायी प्रवासात घेऊन गेलं.या अनोख्या उपक्रमाचे आयोजन विनोद कांबळे, डॉ. राजेंद्र जाधव, प्रा. हेमंत सामंत यांच्यासह अनेक मान्यवरांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. एक सप्ताह चाललेल्या या प्रदर्शनास मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनाचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले होते.बाबासाहेबांच्या स्मृती जागवणाऱ्या आणि त्यांच्या कार्याचे गाढ भान देणाऱ्या या प्रदर्शनाच्या सांगतेनं उपस्थितांच्या मनात एक वेगळीच ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण केली.
शेवटच्या दिवशी मुंबई शहर जिल्हाधिकारी आचल गोयल यांच्यासह अनेकांनी उपस्थिती दाखवली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचे दर्शन घडवणारे प्रदर्शन यशस्वीरित्या संपन्न
RELATED ARTICLES