प
ाटण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंचशील नगर (सोनवडे, ता. पाटण, जि. सातारा) येथे एक वेगळ्या प्रकारचा स्तुत्य उपक्रम पार पडला. प्रशांत माने आणि त्यांच्या तरुण मंडळींनी गावातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटून बाबासाहेबांच्या शिक्षणविषयक विचारांना खऱ्या अर्थाने मानवंदना दिली.”शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे” हे बाबासाहेबांचं ब्रीदवाक्य अंगीकारत या तरुणांनी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरित करत, त्यांच्या शैक्षणिक प्रवासात एक मोलाची मदत केली.या उपक्रमात सहभागी होऊन, काही लहान भावंडांच्या हातात शैक्षणिक साहित्य देण्याची संधी मिळाली, हे स्वतःसाठी मोठं भाग्य असल्याचे पत्रकार प्रशांत बडे म्हणाले. ते पुढे म्हणाले “हे माझं समाजासाठीचं कर्तव्य आहे, बाबासाहेबांनी दिलेल्या ज्ञानाच्या देणगीची छोटीशी परतफेड आहे.” समाज परिवर्तनासाठी शिक्षणाचा उपयोग करून घेणं, हा खरा बाबासाहेबांचा वारसा आहे. आणि या वारशाला चालना देणाऱ्या या तरुणांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. असे शेवटी म्हणाले
“शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे” – बाबासाहेबांच्या विचारांना समर्पित उपक्रम! पंचशील नगर, सोनवडे येथे तरुणाईकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
RELATED ARTICLES