ताज्या बातम्या

‘थँक यू’….! मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचेकडून डाॅ.संदीप डाकवे यांचे कौतुक

तळमावले/वार्ताहर : सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी ‘थँक यू….! असे म्हणत डॉ.संदीप डाकवे यांचे कौतुक केले. डाॅ.डाकवे यांच्या स्पंदन चॅरीटेबल ट्रस्ट ला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देवून सत्कार केला. यावेळी याशनी नागराजन यांच्या समवेत अति.मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहूल कदम, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे, गटशिक्षणअधिकारी संभाजी कानवटे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
डाॅ.संदीप डाकवे यांनी कार्यक्रमादरम्यान त्यांच्या नावात रेखाटलेला अक्षर गणेशा सीईओ मॅडम यांना भेट दिला. या ‘सरप्राईज’ भेटीमुळे सीईओ मॅडम खुष झाल्या. त्यांनी डाॅ.संदीप यांच्या कला कौशल्याबरोबर स्पंदन ट्रस्ट च्या कार्याचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी डाॅ.डाकवे यांच्यासमवेत गयाबाई डाकवे, सौ.रेश्मा डाकवे, गिरीश टिळेकर, पौर्णिमा डाकवे, प्रथमेश डाकवे, स्पंदन डाकवे, कु.सांची डाकवे व अन्य मान्यवर उपस्थित होते. सीईओ याशनी नागराजन यांनी केलेल्या कौतुकामुळे डॉ. संदीप डाकवे भारावून गेले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top