Friday, June 20, 2025
घरमहाराष्ट्रकराड ग्रामीण प्रीमियम लीग २०२५ भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा ५...

कराड ग्रामीण प्रीमियम लीग २०२५ भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा ५ व ६ एप्रिल रोजी घनसोली मध्ये….. एका ट्रॉफीसाठी सहा संघ भिडणार….

प्रतिनिधी(भीमराव धुळप): कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, नवी मुंबई तर्फे कराड ग्रामीण प्रीमियम लीग २०२५ भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा शनिवार,रविवार दि. ५ व ६ एप्रिल रोजी रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सेक्टर ९ घणसोली येथे संस्थापक मोहनराव नायकवाडी(मामा) अध्यक्ष अमितराज चव्हाण व सर्व कमिटी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटच्या मैदानावर “एका ट्रॉफीसाठी” एकूण सहा संघ भिडणार…, गेली तीन वर्ष सतत या स्पर्धा कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित केल्या जातात. यंदाचे के.जी.पी.एल.चे ३ रे पर्व आहे. यावेळी या स्पर्धा डे नाईट स्वरूपात आयोजित केल्या आहेत. त्यामुळे क्रिकेट रसिकांना याचा मनमुराद आनंद घेता येणार आहे. लाखोच्या बक्षिसाची उधळण यावेळी केली जाणार आहे. तरी या स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडा रसिकांनी आवर्जून उपस्थित राहून मनमुराद आनंद लुटावा असे आवाहन संस्थापक व आयोजक मोहनराव नायकवाडी (मामा) तसेच कराड प्रीमियम लीग चे अध्यक्ष अमितराज चव्हाण यांनी केले आहे.

या कार्यक्रमाला अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने वन मंत्री गणेशजी नाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, निलेशजी लंके, आमदार अतुल भोसले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर, यशराज देसाई, ॲड राजाभाऊ पाटील यांच्यासह अनेक मान्यवर प्रीमियम लीगला भेट देणार आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments