Friday, June 20, 2025
घरमहाराष्ट्रसाताराम्हातोबाचा माळ' या पुस्तकास वामन होवाळ पुरस्कार

म्हातोबाचा माळ’ या पुस्तकास वामन होवाळ पुरस्कार

कराड प्रतिनिधी(विजया माने) : दिनांक ३० मार्च २०२५ रोजी नागपूर येथे पार पडलेल्या जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या ११व्या वर्धापन दिवसा निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात कवी, लेखक सत्यवान मंडलिक यांच्या ‘म्हातोबाचा माळ’ या ग्रामीण कथासंग्रहास ‘वामन होवाळ’ राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य, मा. डॉ. राजेश गायकवाड यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आर्यवृत्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठ त्रिपुराचे कुलगुरू डॉ प्रकाश करमाडकर, डॉ. जगन कराडे, जेष्ठ साहित्यिक विलास तायडे, डॉ. रवींद्र तिरपुडे, नाटककार सुनिल रामटेके,चंद्रपूरचे जेष्ठ साहित्यिक विद्याधर बन्सोड, ॲड.भुपेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते तर जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपकुमार खोब्रागडे यांनी या सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविले.
या कार्यक्रमासाठी राज्यभरातून अनेक कवी, लेखक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments