Friday, June 20, 2025
घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री यांच्या हस्ते महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाच्या लोगोचे अनावरण

मुख्यमंत्री यांच्या हस्ते महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाच्या लोगोचे अनावरण

प्रतिनिधी :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथिगृह येथे महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी 2 ते 4 मे 2025 दरम्यान महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पर्यटकांना महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला, संस्कृती आणि खाद्यपरंपरेचा आनंद घेता येणार आहे. राज्यातील पर्यटन वृद्धी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देण्याचा महोत्सवाचा उद्देश आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री शंभूराज देसाई, मुख्य सचिव व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments