Sunday, June 22, 2025
घरमहाराष्ट्रलेखक काशिनाथ माटल यांचा आझाद हिंद सर्वोत्कर्ष मंडळा द्वारे गुणगौरव!

लेखक काशिनाथ माटल यांचा आझाद हिंद सर्वोत्कर्ष मंडळा द्वारे गुणगौरव!

मुंबई : परळ येथील लोकप्रिय आझाद हिंद सर्वोत्कर्ष मंडळाच्या वतीने विभातील लेखक‌ आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे प्रसिद्धी प्रमुख काशिनाथ माटल यांचा,दिल्ली येथे संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात “सावट” आणि “बेवारस” या दोन कथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा होणार आहे,त्या बद्दल ज्येष्ठ ऍडव्होकेट नरेंद्र वालावलकर यांच्या हस्ते रविवारी परळ,लालओठा मैदान‌ येथे ऋद्य सत्कार करण्यात आला.मंडळाचे सरचिटणीस विजय परदेशी यांनी ओळख करून देताना सांगितले,आमच्या परळ विभागातील कथालेखक काशिनाथ माटल यांनी पाच उत्कृष्ट कथासंग्रह लिहून परळकरांचे नाव उंचावले आहे.तत्पूर्वी विभागीय आमदार अजय चौधरी यांनी मंडळाच्या समाजाभिमुख उपक्रमाची प्रशंसा केली.७६व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने विभागातील २५ वकिलांचा‌ ऋद्य सत्कार करण्यात आला.त्यामध्ये महिला वकिलांचा समावेश होता.समारंभाच्या अध्यक्षस्थानी दादर ऍडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड.कोल्हापूरे होते.त्या प्रसंगी मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.समारंभाला विभागातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली.
राष्ट्रीय ‌मिल‌‌ मजदूर संघाद्वारे‌ही ग्रंथालय ‌वाचकमेळाव्याच्या औचित्याने सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्याहस्ते कथालेखक ‌काशिनाथ माटल‌‌ यांचा गुणगौरव‌‌ करण्यात आला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments