ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

देशभरातील सर्व २७ लाख वीज कामगार एक तास संपावर

मुंबई(रमेश औताडे) : वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा सरकारने जो मनमानी प्रयत्न सुरू केला आहे त्या विरोधात देशभरातील सर्व २७ लाख वीज कामगार ३१ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२.०० ते १.०० वाजेपर्यंत एक तास काम बंद आंदोलन करणार आहेत.

अशी माहिती ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज चे सरचिटणीस मोहन शर्मा व महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन चे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी जाहीर प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

” पेन डाउन-टूल डाऊन-काम बहिष्कार ” असे या आंदोलनाचे नाव ठेवले असून एक तास काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. वीज ग्राहकांचे व कामगारांचे मोठे नुकसान करण्याचा सरकारचा डाव आहे. सरकारने तरीही मनमानी कारभार करत खाजगीकरण केले तर मग पुढे काय करायचे त्याबाबत पुढील बैठकीत निर्णय घेणार असा इशाराही दिला आहे.

Scroll to Top